पोस्ट्स

जुलै १२, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुख मटन आणि घावणे

इमेज
    मटन म्हणजे बकरीचे मांस.आपल्याकडे मटन बनवण्याच्या  खूप पद्धती आहेत. उदा. सुक मटन, काळ मटन, मटन मसाला, सावजी मटन (नागपुरी) इत्यादि. आज मी सुक मटन कस बनवायचं हे सांगणार आहे. मटन सोबत कोकणी पद्धतीचे घावणे कसे बनवायचे हे पण  आपण बघुया. * साहित्य: १) मटन ५०० ग्रॅम २) तेल ३) कांदा  ४) लसूण  ५) आलं ६) मिरची  ७) कढीपत्ता ८) खोबर ९) तांदूळ  १०) उडीदडाळ  ११) मीठ   * कृती :    पहिल्यांदा  आपण सुक मटण कसं  करायचं हे  बघुया  मटण स्वच्छ पाण्याने धुऊन घेउन त्याचे बारीक पिसेस करून घ्या. आपण मटण पाणी न घालता शिजवणार असल्यामुळे मटण चे बारीक पिसेस करून घ्यावे लागतात.   एक वाटी सुक खोबरं, तीन कांदे, १० ते १२ लसूण पाकळ्या याच वाटण करून घ्यावे. सुक खोबरं आणि कांदा भाजून घ्यावा.   प्रथम कढई गॅस वर ठेऊन, तेल घालून घ्यावे. कढीपत्ता आणि एक मिरची चिरून थोडस परतावे. त्यात बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेले आलं घालून थोड परतून त्यात पुन्हा आलं आणि लसणाची पेस्ट घालावी. ...