सुख मटन आणि घावणे

    मटन म्हणजे बकरीचे मांस.आपल्याकडे मटन बनवण्याच्या  खूप पद्धती आहेत. उदा. सुक मटन, काळ मटन, मटन मसाला, सावजी मटन (नागपुरी) इत्यादि. आज मी सुक मटन कस बनवायचं हे सांगणार आहे. मटन सोबत कोकणी पद्धतीचे घावणे कसे बनवायचे हे पण  आपण बघुया.
* साहित्य:
१) मटन ५०० ग्रॅम
२) तेल
३) कांदा 
४) लसूण 
५) आलं
६) मिरची 
७) कढीपत्ता
८) खोबर
९) तांदूळ 
१०) उडीदडाळ 
११) मीठ
 * कृती : 
  पहिल्यांदा  आपण सुक मटण कसं  करायचं हे  बघुया
 मटण स्वच्छ पाण्याने धुऊन घेउन त्याचे बारीक पिसेस करून घ्या. आपण मटण पाणी न घालता शिजवणार असल्यामुळे मटण चे बारीक पिसेस करून घ्यावे लागतात. 
 एक वाटी सुक खोबरं, तीन कांदे, १० ते १२ लसूण पाकळ्या याच वाटण करून घ्यावे. सुक खोबरं आणि कांदा भाजून घ्यावा. 
 प्रथम कढई गॅस वर ठेऊन, तेल घालून घ्यावे. कढीपत्ता आणि एक मिरची चिरून थोडस परतावे. त्यात बारीक चिरलेला लसूण आणि बारीक चिरलेले आलं घालून थोड परतून त्यात पुन्हा आलं आणि लसणाची पेस्ट घालावी.
कारण आपण इथं कांदा आणि टोमॅटो वापरणार 
नाही.पेस्ट घालून झाल्यावर हळद, तिखट घालून थोडस परतून त्यात मटण चे बारीक केलेलं पिसेस घालावे. थोडा वेळ चांगलं परतून झाकण मारून झाकणावर पाणी घालून २० ते २५ मिनिटे शिजू द्यावे. पाणी न घातल्यामुळे थोडा वेळाने चेक करावे. थोड्या वेळाने झाकण काढून ,त्यात तयार केलेलं वाटण घालावे आणि मीठ घालुन थोडा वेळ शिजू द्यावे. थोड्या वेळानं कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
     आता आपण घावने कसे बनवायचे आहे,हे  बघुया 
आपण एक किलो तांदूळ आणि एक वाटी उडीदडाळ घेऊन ७ ते ८ भिजवत ठेवावी. नंतर मिक्सरला वाटून घ्यावे आणि पाणी घालून पातळ सर मिश्रण  करून घ्यावे. थोडस मीठ टाकावे. 
नंतर गॅस वर पॅन ठेऊन तेल घालून मिश्रण घालून थोडा वेळ झाकण मारावे, आणि  अर्धा मिनिट ठेऊन झाकण काढून घावन  पलटी करून,गरमगरम सर्व्ह करावे सुक मटण सोबत ..😋
ह्या  रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वर भेटेल. रेसिपी आवडल्यास घरी ट्राय करा आणि लाईक ,शेयर  आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
https://youtu.be/hxtmfLYcew0

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोकणचा राजा......."हापूस आंबा "!

सोयाबीन मिक्स वेज भाजी

Grilled chicken 🍗🍗