कोकणी Fish Thali 🐟🐟

आपल्याला तर माहीत च आहे की कोकण म्हटलं ,की आपल्या डोळयासमोर कोकण च चित्र च उभं राहत. तिथलं ते निसर्गसौंदर्य,समुद्र,झाड आणि ,'पावसाळा 'आला की म काय बोलायलाच नको कोकणची शोभा दुप्पट च वाढते. नंतर म येतो जेवणाचा विषय कोकणातील लोकांचे मुख्य जेवण म्हणजे मासे आणि भात . आज मी "कोकणी Fish थाळी" कशी बनवायची हे सांगणार आहे. *साहित्य : १) तेल २) समुद्राचे मासे (पॉपलेट, सुरमई , कर्ली ..आपल्या आवडीनुसार) ३) तिखट ४) हळद ५) मीठ चवीनुसार ६) कोकम ७) हिरवी मिरची ८) लसूण पाकळ्या ९) २ ते ३ कांदे १०) आले ११) कोथिंबीर १२) नारळ (ओल खोबर अर्धी वाटी) १३) २ टोमॅटो १४) संकेश्र्वरी लाल मिरची ४ ते १५) धने * कृती: कोकणी फिश थाळी बनवण्यासाठी आपल्याला दोन प्रकार बनवायचे आहेत एक फिश फ्राय (मच्छी तळून) फिश करी (मच्छी रस्सा). पहिल्यांदा आपण फिश करी कशी बनवायची हे बघुया, फिश करी बनवण्यासाठी आपण वाटण तयार करून घ्यावे लागेल. * वाटण साठी आपल्याला ४ ते ५ संकेश्वरी मिरची आणि एक चमचाभर धने भिजवून ठेऊन घ्य...