पोस्ट्स

मार्च २४, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कोकणातील शिमगा होळी सण.....

कोकण .....      कोकण म्हणजे सणांची परंपरा जपणारा एक महाराष्ट्राचा एक मुख्य विभाग. त्यातुन शिमगा आणि गणपती उत्सव म्हणजे कोकणकरांचा जीव कि प्राण. तर आज मी , कोकणातील शिमगा या सणाची सुरुवात करणाऱ्या होळी या सणाची माहिती सांगणार आहे. होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो, पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलि वंदन ला रंगाने होळी खेळली जाते.            फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा  होळी  हा सण भारतामध्ये, विशेषतः  उत्तर भारतामध्ये  उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे.    सगळे लोक एकत्र येतात या सणानिमित्त.     आज मी माझ्या च गावच्या होळी च्या सणाबद्दल् लिहणार आहे . माझं गाव  सह्यद्रिच्या पायथ्याला टेकून असलेलं अस्तान नावाचं माझं  गाव , जणू सह्यद्रिला मुजरा करत उभ आहे..बर गावाबद्द्ल आपण नंतर बोलू आता होळी बद्दल बोलू तर होळी च्या सणा मध्ये लाकूड आणि सुकलेले गवत खुप मह्त्वाचे आहे.या सणाच निसर्गाची एक वेगळंच नातं आहे.  तर सर्वात आधी होळीच्या सणाला गावातील मानकरी मंडळी आणि गावातील...