मुंबईचा वडापाव

वडापाव म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं! असा कोणच नसेल की ज्याला वडापाव आवडत नसेल. वडापाव टेस्टी तर असतोच आणि भूक पण भागवतो. वडापाव ची सुरुवात मुंबईतून च झाली. वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी कल्पना आहे. त्यामुळे च मुंबई चा वडापाव म्हणून प्रसिद्ध झाला. नुसत्या मुंबईत च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वडापाव हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे. हा वडापाव कसा बनवायचा हे मी सांगणार आहे. * साहित्य : १) तेल २) बटाटे ३) मोहरी ४) हिंग ५) कढीपत्ता ६) मोहरीची पाने ७) आलं ८) हिरवी मिरची ९) कांदा १०) लसूण ११) उडीद डाळ १२) बडिशेप १३) हळद १४) काळीमिरी पावडर १५) टोमॅटो १६) कोथिंबीर १७) बेसन १८) ओवा १९) जिरे *कृती : पहिल्यांदा बटाटे उकडून घ्यावे आणि सोलून बारीक चिरून घ्यावे. कांदा,मिरची,लसूण,आले बारीक चिरून घ्यावे. वडापाव करताना आपण पाहिली वडापाव ची भाजी करून घेऊ , कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून गॅस मंद आचेवर ठेव...