कोकणातील शिमगा होळी सण.....

कोकण .....
     कोकण म्हणजे सणांची परंपरा जपणारा एक महाराष्ट्राचा एक मुख्य विभाग. त्यातुन शिमगा आणि गणपती उत्सव म्हणजे कोकणकरांचा जीव कि प्राण.
तर आज मी , कोकणातील शिमगा या सणाची सुरुवात करणाऱ्या होळी या सणाची माहिती सांगणार आहे.
होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो, पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलि वंदन ला रंगाने होळी खेळली जाते.
           फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण भारतामध्ये, विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे.
   सगळे लोक एकत्र येतात या सणानिमित्त.
    आज मी माझ्या च गावच्या होळी च्या सणाबद्दल् लिहणार आहे . माझं गाव  सह्यद्रिच्या पायथ्याला टेकून असलेलं अस्तान नावाचं माझं  गाव , जणू सह्यद्रिला मुजरा करत उभ आहे..बर गावाबद्द्ल आपण नंतर बोलू आता होळी बद्दल बोलू
तर होळी च्या सणा मध्ये लाकूड आणि सुकलेले गवत खुप मह्त्वाचे आहे.या सणाच निसर्गाची एक वेगळंच नातं आहे. 
तर सर्वात आधी होळीच्या सणाला गावातील मानकरी मंडळी आणि गावातील लोक जंगलात जातात ज्या झाडाच  लाकूड वापरायचं आहे त्याची सर्वप्रथम पूजा केली जाते. नंतर त्या झाडाला तोडलं जात पण ते  लाकूड सुखं असते. मग ते लाकूड गावात आणलं जात.        होळी उभी करण्यासाठी जिथं होळी करायची आहे त्या जागी नेमक्या अंतरावर खड्डा खणला जातो. त्यात झाडाच  खोड उभ करून त्यात इतर् लाकडे लावली जातात आणि गवत लावून होळी तयार केली जाते खाली फोटोत दाखविल्याप्रमाणे.
          त्याचप्रमाणे संध्याकाळी होळी ची पूजा केली जाते . कायतरी गोड नैवैद्य दाखविला जातो, पण त्याच बरोबर पूर्व परम्परे नुसार पुरणपोळीचा नैवैद्य खास मानला जातो. या दिवशी प्रत्येक घरी  पुरणपोळ्या. बनवल्या जातात. म्हणून् तर आपल्या मराठी भाषेत एक म्हण पण आहे, होळी रे होळी पुरणाची पोळी ...
     आणि यात अजून एक प्रथा आहे कि होळी दहन होताना नवीन लग्न झालेल्या जोडप्याला होळी भोंवती  प्रदक्षिणा घालावी लागते आणि मग होळी त् नारळ टाकावा लागतो.
                अशाप्रकारे होळी दहन पार पाडले जाते..आणि मग गावातील पालखी घरोघरी भेट देऊन शिमगा हा सण  साजरा केला जातो.
                  होळी हा सणाचा इतिहास सांगायच तर हा सण सुरवातीला बंगाल मध्ये खेळला जात असला तरी भारतामधिल् ब्रज् या भगवान श्रीकृष्णांच्या मथुरा, वृंदावन, बरसाना या  भागात मोठ्या प्रमाणात उस्तहाने साजरा केला जातो.
        या सणा मागे एक पौराणिक कथा खूप प्रसिद्ध आहे. भक्त प्रल्हाद आणि त्यांचे वडील दुष्ट राजा हिरन्य कश्यपु . भक्त प्रल्हाद हे विष्णू भक्त होते ते सतत नारायण नामाचा जप करायचे आणि त्यांचे वडील त्यांना हि गोष्ट आवडत नव्हती म्हणून त्यांनी प्रल्हाद यांना भक्ति पासून विमुक्त करण्यासाठी आपली बहीण होलिका हिच्यवर् हि कामगिरी सोपविली.
   होलिका हिला एक वर मिळाला होता कि तिचे  शरीर अग्नित् जळू शकत नाही. होलिका हिने भक्त प्रल्हाद यांना मारण्यासाठी ती त्यांना घेऊन एका आगीत उभारली  पण भक्त प्रल्हाद यांच्या अफाट भक्ती मूळे त्यांना कोणतीहि इजा झाली नाही परंतु होलिका हिची जळून राख झाली आणि म्हणून च तेव्हापासुन् होळी हा सण साजरा केला जातो.

 
मग हा सण प्रत्यक्षात पाहण्याचा अनुभव घायचा असेल तर आमच्या विडिओ  ची लिंक खाली दिली आहे.

https://youtu.be/Y50bLQp8ojM



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोकणचा राजा......."हापूस आंबा "!

सोयाबीन मिक्स वेज भाजी

Grilled chicken 🍗🍗