अंडा भुर्जी🥚🍳
अंडा भुर्जी ही झटपट तयार होणारी रेसिपी आहे. चवीला स्वादिष्ट आणि नाश्ता म्हणून आपण ही ब्रेड किंवा चपाती सोबत खाऊ शकतो.
ही अंडा भुर्जी कशी बनवायची ही रेसिपी खाली क्रमाने दिली आहे
*साहित्य :
१) तेल
२) कडीपत्ता
३) ४ ते ५ अंडी
४) २ कांदे बारीक चिरून
५) १ टोमॅटो बारीक चिरलेला
६) ४ ते५ हिरवी मिरची
७) हळद
८) तिखट
९) मीठ चवीनुसार
*कृती :
पहिल्यांदा कढई घेऊन त्यात २ ते ३ पळी तेल घ्यावे ,कढई गॅसवर ठेऊन तेल गरम करून घ्यावे नंतर कडीपत्ता टाकून थोड्या वेळाने बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे .कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यावा.नंतर त्यात एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावे. हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्यात परतून घ्यावे.
वर दाखवल्या प्रमाणे परतून घेऊन त्यात हळद पाव चमचा ,तिखट एक छोटा चमचा आणि मीठ घालून छान परतून घ्यावे.
त्यानंतर त्या मिश्रण परतून झाल्यावर त्यात एक एक अंडी फोडून घालावी आणि पुन्हा चमच्याने हळूहळू परतून घ्यावे.
नंतर थोड्या वेळाने पावभाजी स्मॅशर ने भुर्जी स्माश करून घ्यावी.
कोथिंबीर घालून भाकरी किवा चपाती सोबत सर्व्ह करावी.....😋😋
ह्या रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वर भेटेल. रेसिपी आवडल्यास घरी ट्राय करा आणि लाईक ,शेयर आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
👩🍳👉https://youtu.be/Oy8Wd-VL7DY
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know.