कोकणी Fish Thali 🐟🐟
आपल्याला तर माहीत च आहे की कोकण म्हटलं ,की आपल्या डोळयासमोर कोकण च चित्र च उभं राहत. तिथलं ते निसर्गसौंदर्य,समुद्र,झाड आणि ,'पावसाळा 'आला की म काय बोलायलाच नको कोकणची शोभा दुप्पट च वाढते. नंतर म येतो जेवणाचा विषय कोकणातील लोकांचे मुख्य जेवण म्हणजे मासे आणि भात . आज मी "कोकणी Fish थाळी" कशी बनवायची हे सांगणार आहे.
*साहित्य :
१) तेल
२) समुद्राचे मासे (पॉपलेट, सुरमई , कर्ली ..आपल्या आवडीनुसार)
३) तिखट
४) हळद
५) मीठ चवीनुसार
६) कोकम
७) हिरवी मिरची
८) लसूण पाकळ्या
९) २ ते ३ कांदे
१०) आले
११) कोथिंबीर
१२) नारळ (ओल खोबर अर्धी वाटी)
१३) २ टोमॅटो
१४) संकेश्र्वरी लाल मिरची ४ ते
१५) धने
* कृती:
कोकणी फिश थाळी बनवण्यासाठी आपल्याला दोन प्रकार बनवायचे आहेत एक फिश फ्राय (मच्छी तळून) फिश करी (मच्छी रस्सा).
पहिल्यांदा आपण फिश करी कशी बनवायची हे बघुया,
फिश करी बनवण्यासाठी आपण वाटण तयार करून घ्यावे लागेल.
* वाटण साठी आपल्याला ४ ते ५ संकेश्वरी मिरची आणि एक चमचाभर धने भिजवून ठेऊन घ्याव्या लागतील . अर्धा तास भिजत ठेवल्या तरी चालतील . लसूण पाकळ्या १० ते १२ ,अर्धी वाटी ओल खोबरं,एक टोमॅटो ,एक कांदा यांचं वाटण करून घ्याव लागेल .
* फिश करी बनवण्याआधी आपल्याला जे फिश चे पिसेस तळायचे आहेत त्यांना मॅरीनेट करावं लागेल. मॅरीनेट करण्यासाठी आपल्याला ३ ते ४ हिरव्या मिरच्या , १ इंच आलं ,७ते ८ लसूण पाकळया यांची पेस्ट ,हळद १ चमचा ,तिखट आपल्या आवडीनुसार , मीठ, कोकम च अगळ हे सगळं लावून २० मिनिटे मॅरीनेट होण्यासाठी ठेऊन द्या.
तोपर्यंत आपण फिश करी बनवून घेऊ. ज्या भांड्या मध्ये आपल्याला करी बनवायची आहे ते भांड गॅस वर ठेऊन ,गॅस मंद आचेवर ठेवावा .२ ते ३ पळी तेल घालून तेल चांगले गरम झाले की कढीपत्ता टाकून घ्यावा नंतर लगेच एक बारीक चिरलेला कांदा घालून तेलात परतून घ्यावा. कांदा गुलाबी रंगाचा झाला की थोडी हळद (पाव चमचा)घालून परतून घ्यावं ,आणि तयार केलेलं वाटण घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं आणि आपल्याला जेवढी करी बनवायची आहे त्या प्रमाणे पाणी घालावे.
पाणी घातल्यानंतर, करी ला उकळी आली की कोकम घालावे आणि फिश चे पिसेस घालावे .आणि १० ते१५ मिनिटे शिजू द्यावे नंतर गॅस बंद करावा.
* आता फिश फ्राय साठी आपल्याला एका डिश मध्ये तांदळाचे पीठ किंवा रवा आपल्या आवडीनुसार घ्यावं.
गॅस वर तवा ठेऊन त्यात तेल २ ते पळी तेल घालून घ्यावे ,तेल गरम झाले की मॅरिनेट केलेले फिश चे पिसेस तांदळाच्या पिठात बुडवून घेऊन देणार तेलात फ्राय करण्यासाठी टाकावे. पिठात बुडवताना हलक्या हाताने फिश च्या दोन्ही बाजूला पीठ लावून घ्यावे जेणेकरून मसाला निघणार नाही.
तेलात फिश चे पिसेस व्यवस्थित रित्या दोन्ही बाजूंनी भाकरी आणि सोबत सर करावे तर तळून घ्यावे, फिश चे पिसेस वर खाली करताना चिमटा किंवा मोठा चमचा वापरावा.
फिश चे पिसेस दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावे.
*आपली फिश करी आणि फिश फ्राय तयार झाले की आपण कोकणी फिश थाळी तयार करण्यासाठी भाकरी आणि भातासोबत सर्व्ह करावे..
ही बघा आपली कोकणी फिश थाळी...
ह्या रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वर भेटेल. रेसिपी आवडल्यास घरी ट्राय करा आणि लाईक ,शेयर आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
👉👍https://youtu.be/eGwIQWEQPVU
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know.