सोयाबीन मिक्स वेज भाजी

   सोयाबीन ची मिक्स वेज भाजी म्हणजे यात आपण गाजर आणि मका वापरून भाजी कशी करायची हे मी सांगणार आहे.  ही भाजी टेस्टी तर असेलच तसेच हेल्दी पण आहे. सोयाबीन खूप पोष्टिक आहे. लहान मुलं नेहमीच्या पद्धतीनं भाज्या खायला कंटाळा करतात अस काही वेगळं केलं तर ते पण अशी भाजी खाऊ शकतात.
         सोयाबीन मिक्स वेज भाजी कशी बनवायची हे क्रमाक्रमाने बघुया.
*साहित्य :
१) तेल 
२) सोयाबीन
३) मक्याचे दाणे
४) कांदा 
५) टोमॅटो
६) आलं
७) लसूण
८) हिरवी मिरची
९) गाजर 
१०) लिंबू
११) कढीपत्ता
१२) हिंग
१३) जिर 
१४) सुक खोबरं
१५)हळद
१६) गरम मसाला
१७) तिखट
१८) मीठ
 *कृती : 
      सोयाबीन चंक्स घेऊन पाण्यात एक तास भिजत ठेवणे.  एक तासानंतर सोया चंक्स पाण्यातून काढून त्यातील पाणी काढून टाकावे. नंतर कांदा टोमॅटो मिरची गाजर सर्व बारीक चिरून घ्यावे.
       कढ‌ई गॅस वर ठेऊन त्यात तेल घालून गरम करून घ्यावे नंतर हिंग,जिर आणि कढीपत्ता घालून फोडणी द्यावी. नंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे.कांदा गुलाबी रंगाचा होत आला की मिरची , आले आणि लसूण बारीक चिरलेली आणि टोमॅटो बारीक चिरलेला घालून परतावे. थोडा वेळ झाकण ठेवावे,नंतर हळद, तिखट आणि मीठ घालुन घ्यावे.

    थोड्या वेळानं कांदा खोबरं आणि लसूण च वाटण घालून आणि रेड चिली सॉस टाकून परतावे. 
नंतर बारीक चिरलेला गाजर टाकून थोड परतून पाणी घालावे. पाणी थोड्या प्रमाणात घालावे आणि मग सोया चंक्स घालून आणि लिंबू पिळून  झाकण घालून १० ते १५ मिनिट शिजू द्यावे. आणि शिजून झाल्यावर गरमगरम भाजी
 चपाती किंवा भाकरी सोबत सर्व्ह करावी......😊

ह्या  रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वर भेटेल. रेसिपी आवडल्यास घरी ट्राय करा आणि लाईक ,शेयर  आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
👉👍https://youtu.be/xuXXlYezgbc

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोकणचा राजा......."हापूस आंबा "!

Grilled chicken 🍗🍗