मुंबईचा वडापाव
वडापाव म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं! असा कोणच नसेल की ज्याला वडापाव आवडत नसेल.
वडापाव टेस्टी तर असतोच आणि भूक पण भागवतो. वडापाव ची सुरुवात मुंबईतून च झाली. वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी कल्पना आहे. त्यामुळे च मुंबई चा वडापाव म्हणून प्रसिद्ध झाला. नुसत्या मुंबईत च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वडापाव हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे.
हा वडापाव कसा बनवायचा हे मी सांगणार आहे.
* साहित्य :
१) तेल
२) बटाटे
३) मोहरी
४) हिंग
५) कढीपत्ता
६) मोहरीची पाने
७) आलं
८) हिरवी मिरची
९) कांदा
१०) लसूण
११) उडीद डाळ
१२) बडिशेप
१३) हळद
१४) काळीमिरी पावडर
१५) टोमॅटो
१६) कोथिंबीर
१७) बेसन
१८) ओवा
१९) जिरे
*कृती :
पहिल्यांदा बटाटे उकडून घ्यावे आणि सोलून बारीक चिरून घ्यावे. कांदा,मिरची,लसूण,आले बारीक चिरून घ्यावे.
वडापाव करताना आपण पाहिली वडापाव ची भाजी करून घेऊ ,
कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून गॅस मंद आचेवर ठेवावा. तेल गरम झाले की मोहरी, हिंग,कडीपत्ता आणि मोहरीची पाने यांची फोडणी द्यावी.
नंतर बारीक चिरलेला कांदा,लसूण आणि आलं घालून परतून घ्यावे. नंतर चिमुटभर उडीद डाळ आणि बडीशेप घालावी. थोडस परतून त्यात चिरलेले बटाटे आणि एक टोमॅटो बारीक चिरलेला घालावा. नंतर मीठ आणि कोथिंबीर घालावी. दोन मिनिटांनी गॅस बंद करावा आणि भाजी तयार झाली.ती थंड झाली की तिचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्यावे.
आता वडा तळण्यासाठी बेसन चे बॅटर करून घेऊ. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात थोड मीठ, ओवा आणि थोडंसं पाणी घालून मिश्रण करून घ्यावे. मिश्रण जास्त पातळ होणार नाही याची काळजी घ्यावी.
गरमारम वडा पाव - सोबत चटणी लावून सर्व्ह करावा...चटणी ऐवजी तुम्ही सॉस किंवा केचप वापरू शकता.
ह्या रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वर भेटेल. रेसिपी आवडल्यास घरी ट्राय करा आणि लाईक ,शेयर आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा.
👍👉https://youtu.be/EFrwaVwMANw
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know.