कोकणचा राजा......."हापूस आंबा "!
कोकणचा राजा......."हापूस आंबा "!
कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे.
हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमांत सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.
तर आंबा फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातील काही भागात सुद्धा वेगवेगळ्या जातींची लागवड केली जाते . गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगणपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. जगातील आंब्याची ५६% लागवड हि भारतात केली जाते.
साधारपणे आंब्याचे झाड कसे असते हे सगळ्यांना माहीतच असेल ,परंतु काही झाड जी कलम केली जातात ती कमी उंचीची असली तरी त्याला फळ येतात जस खाली दिलेल्या चित्रात तुम्ही पाहू शकता ,
तुम्ही पाहू शकता कि इतकी छोटी झाड असून सुद्धा त्यांना फळ आलेत आणि ती जमिनीला टेकली आहेत. कोकणात कलम हा हा प्रकार जास्त आढळतो.
आंब्याच्या फुलांना मोहोर (हिंदीत बौर) असे म्हणतात. मोहोराला एक प्रकारचा मंद सुवास असतो ह्या प्रकारात फळाच्या बाहेरील भागात गर असून आतमध्ये कडक कवच असते आणि ह्या कवचाच्या आत फळाचे बी असते. ह्या कवचाला आंब्याची कोय असे म्हणतात. आंब्याच्या जातीप्रमाणे त्याच्या फळांच्या आकारात बराच फरक असतो. कच्च्या आंब्याला कैरी असे म्हणतात. कैरीचा रंग साधारणपणे हिरवा असतो. पूर्ण पक्व फळाचा रंग पिवळा, केशरी आणि लाल असा बदलता दिसून येतो.. कच्च्या कैरी चवीला आंबट असते. कैरी पिकल्यावर गोड लागते. आंबा भारतात सर्व ठिकाणी आढळून येते. त्याचा वापर विविध प्रकारे करता येतो.
कैरी चा वापर लोणचं बनवण्यासाठी खास करून केला जातो. तसेच या कैरीपासून चटणी ,पन्हे आणि तिखट मीठ लावून कर बट्या आणि पावसाळ्यात कालवणात वापरण्यासाठी लागणारी आमसुले असे अनेक प्रकार नुसत्या कैरीपासून केले जातात.
कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास 'आंब्याचा माच लावणे' किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात.अशा प्रकारे साधारणतः १०-१५ दिवसात, झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.हा १०-१५ दिवसाचा अवधी कमी करण्यासाठी रसायने टाकून आंबा, केळी, चिकू इत्यादी फळे पिकविण्याचे एक तंत्र आहे. त्याने ३-४ दिवसात आंबा पिकतो. कॅल्शियम कारबाईड इत्यादी रसायनांचा वापर यासाठी करण्यात येतो. या पद्धतीत रसायनांचा काही अंश फळात जातो. ते मानवी आरोग्यास घातक ठरू शकते. आंबा पिकवण्याच्या दुसऱ्या पद्धतीत आंब्याची कैरी तोडून ती १ ते २ दिवस आंब्याच्या पानांत किवा धान्यात दाबून ठेवतात.
आंब्याला धार्मिक कार्यातही खूप मह्त्व आहे. कोणत्याही शुभप्रसंगी, मंगल कार्यात आणि सणाच्या दिवशी दाराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात.
आयुर्वेदानुसार लांबट आंब्यापेक्षा गोल आंबे जास्त चांगले असतात. बिनारेषेचे, चांगले पिकलेले अधिक गर असलेले पातळ सालीचे आणि लहान कोय असलेले आंबे चांगले समजावेत.
आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ पित्त दूर करणारा आहे. कैरी मध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या साठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. पन्हे प्यायालामुळे उन्हाळ्याच त्रास खूपच कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो. आपल्याला आरोग्य देण्याच्या दृष्टीने या दिवसात कैरीची डाळ खाण्याची पद्धत आहे. कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही.
असं हा संपूर्ण गुणकारी फळ आणि याच झाड सुद्धा .म्हणूनच का याला फळांचा राजा बोलतात . आणि हा पिकलेल्या आंब्यापासून आमरस बनवतात , मिल्कशेक तसेच आंब्याचा शिरा पण बनवला जातो. बरं या सगळ्या पदार्थांची रेसिपी मी तुम्हला पुढच्या ब्लॉग मध्ये नक्कीच सांगेन...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know.