चिकन बिर्याणी🍗🐔

     बिर्याणी हा आपल्या भारतात प्रामुख्याने बनवला जाणारा आवडता खाद्यपदार्थ आहे.  भाात,मांस आणि मसाले वापरून बिर्याणी  तयार केली  जाते. बिर्याणी करायची तर मसाला पाहिजे, हल्ली बाजारात विविध प्रकारचे मसालेे मिळतात. बिर्याणीचा सेपरेट मसाला विकत भेटतो. हा मसाला आपण घरी पण बनवू शकतो.

        बिर्याणी मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ' दम बिर्याणी, हैदराबादी बिर्याणी, कोलकाता बिर्याणी असे प्रकार आहेत. बिर्याणी चिकन किंवा मटन वापरून बनवू शकतो. शाकाहारी  लोकांसाठी व्हेज बिर्याणी बनवू शकतो. बिर्याणी ही एक च प्रकार आहे फक्त तांदुळाच्या प्रकार बदलत जातात 
आज मी बिर्याणी चा मसाला घरात बनवून आणि साधा तांदूळ वापरून चिकन   बिर्याणी कशी बनवायची हे सांगणार आहे. 
*साहित्य :
१) तेल
२) तूप
३) तांदूळ (आवश्यकतेनुसार)
५) ५०० ग्रॅम चिकन 
६) कांदे
७) बटाटे
८) तमालपत्र
९) हिंग
१०) जिर
११) काळीमिरी
१२) वेलची 
१३) मसाला वेलची
१४) दालचिनी
१५) धने 
१६) हिरवी मिरची 
१७) लसूण
१८) आले
१९) लिंबू
२०) मीठ
२१) खसखस 
२२) कोथिंबीर
*कृती :
 चिकन बिर्याणी कशी बनवायची हे आपण क्रमाक्रमाने बघुया .
* पहिल्यांदा आपल्याला बिर्याणी साठी मसाला तयार    करावा लागेल त्यासाठी ,कढई गॅसवर ठेऊन गॅस मंदआचेवर ठेऊन कढई थोडी गरम झाल्यावर त्यात तमालपत्र,वेलची,लवंग,मसाला वेलची,दालचिनी चे तुकडे , काळीमिरी थोड भाजून घ्यावं.आणि मिक्सर ल वाटून घ्यावा , की घरघुती बिर्याणी मसाला तयार.
* आता आपल्याला चिकन मसाला तयार करावा लागेल 
त्यासाठी आपल्याला लागणारे भांड गॅस वर ठेऊन ,तेल घालून तेल गरम झालं की हिंग, जिरे आणि कढीपत्ता ची फोडणी द्यावी. मग उभा चिरलेला कांदा घालून तेलात परतून घ्यावा त्यानंतर त्यात मिरची ,आले आणि लसूण  ची पेस्ट घालावी थोडा वेळ परतून घ्यावे.नंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून परतून घ्यावा. हळद एक चमचा , तिखट २ छोटे चमचे आणि आपण तयार केलेला बिर्याणी मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतणे.
तेल सुटल्यावर त्यात चिकन चे पिसेस घालावे नंतर मीठ आवडीनुसार आणि कोथिबिर घालून चिकन १५ ते२० मिनिटे शिजू द्यावे
* बिर्याणी साठी आपल्याला भात वेगळा शिजवावा लागतो ,त्यासाठी सर्वप्रथम तांदूळ घेऊन स्वच्छ पाण्याने धुऊन घावे . नंतर गॅस वर ठेऊन मंद आचेवर भात शिजवावा. भात शिजवताना त्यात मसाला वेलची एक ,४ ते ५ लवंग , दालचिनी चे तुकडे,तमालपत्र १ ते२, आणि एक चमचा शुद्ध देसी घी म्हणजेच तूप घालावे.भात जास्त वेळ शिजू देऊ नये , थोडा शिजला की त्यातील पाणी चाळणी ने गाळून भात मोकळा करून ठेवावा.
* चिकन मसाला होईपर्यंत सजावटीसाठी कांदा बटाटा बारीक चिरून तेलात तळून घावा ब्राऊन रंग यईपर्यंत तळून घ्यावे. कांदा छान कुरकरीत करून घ्यावा. आणि काजू, बदाम चे काप आपल्या आवडीनुसार कापून घ्यावे.
* बिर्याणी च्या फायनल स्टेप ला आपल्याला ज्या भांड्यात किंवा मोठ्या टोपात बिर्याणी चे ठर लावायचे असतील त्याला पूर्ण तूप लाऊन घ्यावे. थर लावताना प्रथम चिकन मसाला पहिल्यांदा लाऊन घ्यावा त्यावर भाताची लेयर लावून घ्यावी ,त्यावर कांदा बटाटा चे काप आणि काजू बदाम चे काप लावून घ्यावे असेच थर ४ ते५ थर लावून घेऊन कोथिंबीर टाकून घेऊन त्या भांड्यावर घट्ट बसेल असे झाकण ठेऊन , भांडे गॅसवर ठेऊन गॅस मंद आचेवर ठेवावा आणि १० ते १५ मिनिटे शिजून घेऊन तयार बिर्याणी गरमगरम प्लेट मध्ये सर्व्ह करावी😋😋.....
ह्या  रेसिपी चा व्हिडिओ तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर वर भेटेल. रेसिपी आवडल्यास घरी ट्राय करा आणि लाईक ,शेयर  आणि आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा
👩‍🍳👉👍https://youtu.be/DnLnbvoFKuM


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोकणचा राजा......."हापूस आंबा "!

सोयाबीन मिक्स वेज भाजी

Grilled chicken 🍗🍗