सुरमई फिश फ्राय....
सुरमई फिश फ्राय .....
मासे हा प्रकार जेवणात मुख्यतः नॉनव्हेज प्रकारात मोडतो . त्यात अनेक प्रकारचे मासे आहेत जे आपण आपल्या आहारात समाविष्ट करतो. जस कि पॉपलेट , बांगडा ,सुरमई ,बोंबील असे अनेक प्रकार आहेत सगळ्याची नाव नाही सांगत . तर मी आज तुम्हाला सुरमई हा मासा कसा फ्राय करावा याबद्दल रेसिपी सांगणार आहे
सुरमई बाजारातून आणल्यानंतर स्वछ धुवून घ्यावी आणि नंतर तिच्य पिसेस ला कोकम चा पाणी किंवा कोकम आगळ लावून घ्यावा . थोडा वेळ तसाच ठेऊन द्यावी.
त्यानंतर सुरमई च्या पिसेस ला मीठ , हळद ,मालवणी मसाला लावून मॅरीनेट करून १० ते १५ मिनिटे ठेवावे . मालवणी मसाला नसल्यास तिखट (मिरची मसाला ) लावून ठेवावा. खाली चित्रात दाखविल्या प्रमाणे,
त्यानतंर तिला फ्राय करण्याआधी , कव्हर करणयासाठी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ त्यामध्ये लाल तिखट मसाला मिसळून ते सुरमई च्या पीस ला दोन्ही बाजूने चांगल लावून घ्यावे. एकीकडे तवा गॅसवर ठेवून त्यात तेल घालून तेल थोडं गरम झालं कि त्यात सुरमई चे पिस चांगले फ्राय करून घ्यावे . आणि फ्राय करत असताना त्यामध्ये थोडा कढीपत्ता आणि कोथिंबीर घालावी त्याने चांगला स्वाद येतो.
रेसिपी आवडली असेल तर नक्की घरी एकदा तरी करून पहा , खूप सोपी रेसिपी आहे . आवडली तर शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणींना . हि रेसिपी पाहायची असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करून पाहू शकता.
https://youtu.be/qHqjt2Q26l4
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
if you have any doubts, Please let me know.