गाबोळी फ्राय.....( मासेअंडी फ्राय)

गाबोळी फ्राय.....( मासेअंडी फ्राय)

    
        आपण पहातो कि पूर्ण जगात मासे हे  अन्न  म्हणून खाल्ले जातात . पण काही जणांना माहित हि नसेल कि माशाची अंडी पण आपण वेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो . माशांच्या अंडी ना गाभोळी असं हि म्हटलं जात . ती आपण वेगळी बनवून खाऊ शकतो जस कि  गाभोळी मसाला , गाभोळी फ्राय . तर मी आज एक अनोखी रेसिपी सांगणार आहे . गाभोळी फ्राय .... 
            साहित्य :
         १. कोकम आगळ 
         २.  बेसन पीठ 
         ३. मीठ 
         ४. कढीपत्ता 
         ५. लाल तिखट (अंबारी मसाला )
         ६. गाभोळी 
 

    वर चित्रात दाखविल्याप्रमाणे गाभोळी असते थोडी जाड आणि लांबट आकाराची असते . बाजारातून आणल्यानतंर
ती स्वछ  धुवून घ्यावी आणि त्याला मीठ आणि  कोकम आगळ (कोकम चा रस ) लावून घ्यावा थोडावेळ तसाच सोडून ठेवावे . जवळ जवळ १० मिनिटे तसेच ठेवावे .
        तोपर्यंत बेसन पीठ घेऊन त्यात तिखट अंबारी मसाला आणि मीठ मिक्स करून घ्यावे. गाभोळी ला  दोन्ही बाजूने आधी  अंबारी मसाला व्यवस्थित लावून घ्यावा मॅरीनेट करून ठेवावे . 
दोन्ही बाजूनी बेसन चे तयार मिश्रण लावून घ्यावे 
नंतर फ्राय करण्यासाठी तव्यामध्ये जरा नेहमीपेक्षा जास्त तेल ओतून थोडं तेल कडकडीत  गरम झाल्यानंतर त्यात मॅरीनेट केलेली गाभोळी सोडून ती चांगली खरपूस फ्राय होईपर्यंत भाजावी. थोडी जाड असल्यानं मंद आचेवर फ्राय करावी. 
    फ्राय करत असताना मध्ये थोडा कढीपत्ता , कोथिंबीर घालावी जेणेकरून त्यांचा स्वाद येईल . मंद आचेवर फ्राय केल्यानं गाभोळी आतून पण चांगली  शिजली  जाते. मध्ये मध्ये थोडं थोडं तेल चमच्याने सोडावे . एका बाजून भाजल्यानंतर दुसऱ्याबाजून पालटून भाजावी . 
    खरपूस भाजून झाल्यानंतर ती सर्व्ह करावी असच किंवा भाकरीसोबत पण छान टेस्ट लागते 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोकणचा राजा......."हापूस आंबा "!

सोयाबीन मिक्स वेज भाजी

Grilled chicken 🍗🍗