पोस्ट्स

गाबोळी फ्राय.....( मासेअंडी फ्राय)

इमेज
गाबोळी फ्राय.....( मासेअंडी फ्राय)              आपण पहातो कि पूर्ण जगात मासे हे  अन्न  म्हणून खाल्ले जातात . पण काही जणांना माहित हि नसेल कि माशाची अंडी पण आपण वेगळ्या पद्धतीने खाऊ शकतो . माशांच्या अंडी ना गाभोळी असं हि म्हटलं जात . ती आपण वेगळी बनवून खाऊ शकतो जस कि  गाभोळी मसाला , गाभोळी फ्राय . तर मी आज एक अनोखी रेसिपी सांगणार आहे . गाभोळी फ्राय ....              साहित्य :            १. कोकम आगळ             २.  बेसन पीठ            ३. मीठ              ४. कढीपत्ता            ५. लाल तिखट (अंबारी मसाला )          ६. गाभोळी        वर चित्रात दाखविल्याप्रमाणे गाभोळी असते थोडी जाड आणि लांबट आकाराची असते . बाजारातून आणल्यानतंर ती स्वछ  धुवून घ्यावी आ...

सुरमई फिश फ्राय....

इमेज
सुरमई फिश फ्राय .....        मासे हा प्रकार जेवणात मुख्यतः नॉनव्हेज प्रकारात मोडतो . त्यात अनेक प्रकारचे मासे आहेत जे आपण आपल्या आहारात समाविष्ट करतो.  जस कि पॉपलेट , बांगडा ,सुरमई ,बोंबील असे अनेक प्रकार आहेत सगळ्याची नाव नाही सांगत . तर मी आज तुम्हाला सुरमई हा मासा कसा फ्राय करावा याबद्दल रेसिपी सांगणार आहे             सुरमई  बाजारातून आणल्यानंतर स्वछ धुवून घ्यावी आणि नंतर तिच्य  पिसेस ला  कोकम चा पाणी किंवा कोकम आगळ लावून घ्यावा . थोडा वेळ तसाच ठेऊन द्यावी.  त्यानंतर सुरमई  च्या पिसेस ला मीठ , हळद ,मालवणी मसाला  लावून मॅरीनेट करून १० ते १५ मिनिटे ठेवावे . मालवणी मसाला नसल्यास तिखट (मिरची मसाला ) लावून ठेवावा. खाली चित्रात दाखविल्या प्रमाणे, त्यानतंर तिला फ्राय करण्याआधी , कव्हर करणयासाठी बेसन पीठ किंवा तांदळाचं पीठ त्यामध्ये लाल तिखट मसाला मिसळून ते सुरमई च्या पीस ला दोन्ही बाजूने चांगल लावून घ्यावे. एकीकडे तवा गॅसवर ठेवून त्यात तेल घालून तेल थोडं गरम झालं कि त्यात सुरमई चे पिस चांगले फ्राय...

कोकणचा राजा......."हापूस आंबा "!

इमेज
कोकणचा राजा......."हापूस  आंबा "!      आज आपण कोकण चा सर्वप्रसिद्ध  फळ ,"आंबा" कोकण चा राजा हापूस आंबा अस हि म्हटलं जात. आंबा असं हे जगप्रसिद्ध फळ आहे .  तस याला फळांचा राजा देखील म्हटलं जात.  एप्रिल - जून  हा या फळाचा मोसम असतो.  आता तर कोकणातील आंबा हे फळ जगातील अनेक देशात निर्यात केलं जात. याच्या अनेक प्रजाती आहेत. त्यातील मुख्य म्हणजे हापूस आंबा .  हापूस हा महाराष्ट्रातील मुख्य म्हणजे कोकण भागात विशेतः मिळतो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे ते दोन विभाग ,जणू हापूस चे माहेरघर . आता विज्ञान खूप पुढं गेलं आहे याच्या अनेक संकरित जाती निर्माण केल्या गेल्या आहेत. परंतु मूळ तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा.......                     कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे. हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशे...

Grilled chicken 🍗🍗

इमेज
          ग्रील्ड चिकन                                                आपल्याकडे कोंबडीचा मांस म्हणजेच चिकन बनवण्याच्या खूप पद्धती आहेत. सुक चिकन, बटर चिकन, चिकन मसाला अशा अनेक पद्धती आहेत. हल्ली तर चिकन चा वापर सँडविच, पिझ्झा,बर्गर अनेक फास्टफुड मध्ये पण होतो. Grilled chicken म्हणजेच  मॅरीनेट चिकन चे पिसेस चौकोनी जाळीवर भाजणे. चिकन भाजल्यानंतर त्याला एक वेगळीच टेस्ट येते.       Grilled chicken कसं करायचं ते बघुया... *साहित्य: 1) तेल २) चिकन पिसेस ३) हिरवी मिरची ४) कढीपत्ता ५) कोथिंबीर ६) आलं  ७) लसूण  ५) कांदा  ६) टोमॅटो ७) हळद  ८) तिखट ९) मीठ 10) लिंबू आणि * कृती :         चिकन मॅरिनेट करण्यासाठी पहिल्यांदा हिरवा मसाला तयार करून  घ्यावा लागेल. हिरवा मसाला तयार करण्यासाठी कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची, लसूण पाकळ्या आणि आलं याच  वाटण करून घ्यावे म्हणजे - च हिरवा मसाला तयार करून घ्...

कोकणातील शिमगा होळी सण.....

कोकण .....      कोकण म्हणजे सणांची परंपरा जपणारा एक महाराष्ट्राचा एक मुख्य विभाग. त्यातुन शिमगा आणि गणपती उत्सव म्हणजे कोकणकरांचा जीव कि प्राण. तर आज मी , कोकणातील शिमगा या सणाची सुरुवात करणाऱ्या होळी या सणाची माहिती सांगणार आहे. होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो, पहिल्या दिवशी होळी दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलि वंदन ला रंगाने होळी खेळली जाते.            फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा  होळी  हा सण भारतामध्ये, विशेषतः  उत्तर भारतामध्ये  उत्साहाने साजरा होणारा एक सण आहे.    सगळे लोक एकत्र येतात या सणानिमित्त.     आज मी माझ्या च गावच्या होळी च्या सणाबद्दल् लिहणार आहे . माझं गाव  सह्यद्रिच्या पायथ्याला टेकून असलेलं अस्तान नावाचं माझं  गाव , जणू सह्यद्रिला मुजरा करत उभ आहे..बर गावाबद्द्ल आपण नंतर बोलू आता होळी बद्दल बोलू तर होळी च्या सणा मध्ये लाकूड आणि सुकलेले गवत खुप मह्त्वाचे आहे.या सणाच निसर्गाची एक वेगळंच नातं आहे.  तर सर्वात आधी होळीच्या सणाला गावातील मानकरी मंडळी आणि गावातील...

मुंबईचा वडापाव

इमेज
         वडापाव म्हटलं की लगेच तोंडाला पाणी सुटतं! असा कोणच नसेल की ज्याला वडापाव आवडत नसेल.  वडापाव टेस्टी तर असतोच आणि भूक पण भागवतो. वडापाव ची सुरुवात मुंबईतून च झाली. वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी कल्पना आहे. त्यामुळे च मुंबई चा वडापाव म्हणून प्रसिद्ध झाला. नुसत्या मुंबईत च नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात वडापाव हा खाद्यपदार्थ प्रसिद्ध आहे.  हा वडापाव कसा बनवायचा हे मी सांगणार आहे. * साहित्य : १) तेल २) बटाटे  ३) मोहरी ४) हिंग ५) कढीपत्ता ६) मोहरीची पाने ७) आलं ८) हिरवी मिरची ९) कांदा १०) लसूण  ११) उडीद डाळ १२) बडिशेप १३) हळद १४) काळीमिरी पावडर १५) टोमॅटो १६) कोथिंबीर १७) बेसन  १८) ओवा १९) जिरे *कृती :     पहिल्यांदा बटाटे उकडून घ्यावे आणि सोलून बारीक चिरून घ्यावे. कांदा,मिरची,लसूण,आले बारीक चिरून घ्यावे.  वडापाव करताना आपण पाहिली वडापाव ची भाजी करून घेऊ ,  कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालून गॅस मंद आचेवर ठेव...

सोयाबीन मिक्स वेज भाजी

इमेज
   सोयाबीन ची मिक्स वेज भाजी म्हणजे यात आपण गाजर आणि मका वापरून भाजी कशी करायची हे मी सांगणार आहे.  ही भाजी टेस्टी तर असेलच तसेच हेल्दी पण आहे. सोयाबीन खूप पोष्टिक आहे. लहान मुलं नेहमीच्या पद्धतीनं भाज्या खायला कंटाळा करतात अस काही वेगळं केलं तर ते पण अशी भाजी खाऊ शकतात.          सोयाबीन मिक्स वेज भाजी कशी बनवायची हे क्रमाक्रमाने बघुया. *साहित्य : १) तेल  २) सोयाबीन ३) मक्याचे दाणे ४) कांदा  ५) टोमॅटो ६) आलं ७) लसूण ८) हिरवी मिरची ९) गाजर  १०) लिंबू ११) कढीपत्ता १२) हिंग १३) जिर  १४) सुक खोबरं १५)हळद १६) गरम मसाला १७) तिखट १८) मीठ   *कृती :         सोयाबीन चंक्स घेऊन पाण्यात एक तास भिजत ठेवणे.  एक तासानंतर सोया चंक्स पाण्यातून काढून त्यातील पाणी काढून टाकावे. नंतर कांदा टोमॅटो मिरची गाजर सर्व बारीक चिरून घ्यावे.        कढ‌ई गॅस वर ठेऊन त्यात तेल घालून गरम करून घ्यावे नंतर हिंग,जिर आणि कढीपत्ता घालून फोडणी द्यावी. नंतर ब...